|
श्री. पु. भागवत
मराठीतील ज्येष्ठ संपादक आणि प्रकाशक. श्री. पु. भागवत आणि त्यांच्या मौज प्रकाशन गृहाला मराठी साहित्य जगतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. साक्षेपी आणि मर्मग्राही दृष्टी असलेल्या श्री. पु. भागवतांनी संपादक या नात्याने ‘मौज’ आणि ‘सत्यकथा’ या त्यांच्या नियतकालिकांतून नवकथा-नवकवितेला मराठी साहित्यात मोलाचे स्थान मिळवून दिले. आपल्या कारकीर्दीमध्ये श्री. पु. भागवतांनी अनेक नामवंत लेखक घडविले आणि मराठी साहित्याला नवे वळण प्राप्त झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी आजही श्री. पु. भागवत संपादनाच्या कार्यामध्ये मग्न आहेत. |
 आपण Microsoft Office 2003 मराठी सॉफ्टवेअर पाहिले का? (आम्ही आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितो)
Microsoft Office 2003 हे मराठी सॉफ्टवेअर पाहिले. ज्ञान तळागाळापर्यंत जायला पाहिजे. लवकर जायला पाहिजे. योग्य तर्हेने पोहोचायला पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान मातृभाषेतून पाहिजे. यातच राज्याचे आणि लोकांचे हित आहे. त्यामुळे मराठीमध्ये सॉफ्टवेअर करण्याचा Microsoft चा उपक्रम अतिशय योग्य आहे. |
|
Microsoft त्यांच्या Project Bhasha या उपक्रमाद्वारे Windows XP, Microsoft Office 2003 यासारख्या जागतिक सॉफ्टवेअर्सची भारतीय भाषांमधून निर्मिती करीत आहे त्याबाबत आपल्याला काय वाटते? |
| आज मोठा समाज मातृभाषेतून शिक्षण घेत आहे. ज्यांना मुळात शिक्षण नाही. मराठीमध्ये सॉफ्टवेअर उपलब्ध करण्याचा Microsoft चा हा उपक्रम संगणकाच्या प्रसाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संगणक शिक्षणासाठी इंग्रजी भाषेचा एक मोठा अडसर होता, तो यामुळे जाऊ शकेल. सरकारी पातळीवर, ग्रामीण भागात याचा उपयोग होईल. |
|
Microsoft Office 2003 मराठीमुळे मराठीच्या संगणक क्षेत्रातील मानकीकरणास चालना मिळेल असे आपल्याला वाटते का? |
| Microsoft Office 2003 मराठीमुळे मराठीच्या संगणक क्षेत्रातील प्रमाणीकरणास चालना मिळेल असे मला वाटते. |
|
Microsoft Office 2003 मराठीमधील आवडलेल्या सुविधा – (त्यापैकी आपल्याला कोणती सुविधा सर्वात उपयोगी वाटली?) |
| या सॉफ्टवेअरमधील मराठी रूपसंच, तरंगते दृश्यमान कीबोर्डस्, वर्णमालेनुसार अकारविल्हे क्रमवारी, शोध-बदल, सूत्रपट्टीमधील मराठी मजकूर या सुविधा मला आवडल्या. |
|
Microsoft Office 2003 मराठीचा महाराष्ट्रातील जनतेला खर्या अर्थाने फायदा होण्यासाठी त्यामध्ये कोणत्या अधिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते? |
संगणकाच्या रूपाने नवी संस्कृती उदयास येत आहे. त्याची स्वतःची परिभाषा इंग्रजी आहे. ही परिभाषा संकल्पनांची बनलेली आहे ज्या आपल्या भाषेमध्ये अस्तित्वात नाहीत. तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांसाठी नव्या परिभाषेच्या निर्मितीची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी नवी मराठी परिभाषा तयार करू नका. संस्कृतनिष्ठ व बोजड शब्द वापरू नका. भाषेमध्ये उपलब्ध असलेले सोपे शब्द वापरा. बोलीभाषेला जवळ जाणारी भाषा पाहिजे. शब्दाला प्रतिशब्द काढू नये. एक शब्द निवडून त्याला एकापेक्षा अधिक शब्द काढावे. मूळ शब्दाला सर्वात जवळ जाणारा आणि सोपा शब्द निवडावा. जो शब्द रूळेल तो प्रमाण म्हणून घ्यावा. मराठीमध्ये रूळलेले काही इंग्रजी शब्द तसेच ठेवा.
तंत्रज्ञान कुणासाठीही थांबत नसते. ते देशाच्या सीमाही मान्य करीत नाही. त्यामुळे प्रमाणभाषाही बदलत असते. जे लोकांनी स्वीकारलेले आहे तेच शेवटी शासन स्वीकारते. जरा थांबून लोक काय स्वीकारतात ते पहा. भविष्यातील आवृत्त्यांमध्ये लोकांनी स्वीकार न केलेल्या शब्दांमध्येच सुधारणा करा. याखेरीज मायक्रोसॉफ्टसारख्या संस्थेने शुद्धलेखन तपासनीस आणि पर्यायी शब्दकोश याकडे लक्ष द्यावयास हवे. मदतही पूर्णतः मराठीत असणे आवश्यक आहे. मराठी कसे शिकवावे या प्रकारच्या अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या सोयीमुळे ग्रामीण भागातील शिक्षकांना मराठी शिकविण्यास मदत मिळेल. |
|
Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये कोणत्या प्रकारे आपण आपला सहभाग देऊ इच्छिता? |
| Microsoft च्या प्रोजेक्ट भाषा उपक्रमामध्ये तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागेल, ते मी देईन. |