About BhashaIndia | Contribute | SiteMap
  Patrons Developers
Hindi Tamil Kannada Gujarati Marathi Telugu Bengali Malayalam Punjabi Konkani Oriya Sanskrit Nepali
Home > Patrons > IndicIT > Marathi > MogheSudhir Welcome Guest!
श्री. सुधीर मोघे
मराठीतील ज्येष्ठ गीतकार. सुमारे दोन शतके ते मराठी चित्रपटांकरीता गीतरचना करीत आहेत. श्री. सुधीर मोघे कवी आणि गायक म्हणूनही महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात. त्यांचे कवितावाचनाचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. मराठी लघुपटांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन या क्षेत्रातही श्री. मोघे कार्यरत आहेत.
आपण Microsoft Office 2003 मराठी सॉफ्टवेअर पाहिले का? (आम्ही आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितो)
होय. मी ते पाहिलं आणि मला ते अतिशय आवडलं. ही गोष्ट घडणं अत्यंत आवश्यक होतं असं मला वाटतं.
Microsoft त्यांच्या Project Bhasha या उपक्रमाद्वारे Windows XP, Microsoft Office 2003 यासारख्या जागतिक सॉफ्टवेअर्सची भारतीय भाषांमधून निर्मिती करीत आहे त्याबाबत आपल्याला काय वाटते?
हा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे. आपण ग्लोबल कल्चर ही बाब कितीही महत्त्वाची मानली तरी कोणीही व्यक्ति आपापल्या मायबोलीत जितकी आत्मविश्वासानं व्यक्त होते तितकी कुठल्याही दुसर्‍या भाषेत होणं कठीण आहे. संगणक ही एका अर्थी नवीन वैश्विक भाषा झाली आहे व होणारही आहे. पण समाजाच्या सर्व थरापर्यंत तो पोचायचा असेल तर ह्या “तंत्रभाषेची नाळ” प्रत्येकाच्या मायबोलीशी जोडली गेली पाहिजे.
Microsoft Office 2003 मराठीमुळे मराठीच्या संगणक क्षेत्रातील मानकीकरणास चालना मिळेल असे आपल्याला वाटते का?
Microsoft Office 2003 मराठीमुळे संगणक क्षेत्रातील प्रमाणीकरणास चालना तर मिळेलच, शिवाय हे पहिलं पाऊल पुढची पावलं टाकण्याची प्रेरणा नक्कीच निर्माण करेल.
Microsoft Office 2003 मराठीमधील आवडलेल्या सुविधा – (त्यापैकी आपल्याला कोणती सुविधा सर्वात उपयोगी वाटली?)
Microsoft Office 2003 मराठीमधील अनेक नव्या सुविधा मला आवडल्या. त्यापैकी प्रमुख म्हणजे मराठी रूपसंच, बहुविध कीबोर्डस्, मराठीतून शोध-बदल, शीर्षलेख-तळलेख, मराठी वर्णमालेनुसार अकारविल्हे क्रमवारी, मराठीतून तक्ते व आलेख, संपूर्णपणे मराठीतून सादरीकरण आणि सहजगत्या मराठीतून इ-मेलचे आदान-प्रदान.
Microsoft Office 2003 मराठीमध्ये मजकूराची साठवण संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय यूनिकोड मानकावर आधारित असल्यामुळे, मराठी भाषेतील मजकूर (Text) व माहितीकोष (Database) यांची इंटरनेट व इतर संवाद माध्यमांद्वारे देवाणघेवाण करणे सुलभ होईल असे आपल्याला वाटते का?
होय.
Microsoft Office 2003 मराठीचा महाराष्ट्रातील जनतेला खर्‍या अर्थाने फायदा होण्यासाठी त्यामध्ये कोणत्या अधिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते?
हा नवा प्रयोग आधी स्वतः वापरून पहावा लागेल.
Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिता का?
नक्की आवडेल.
Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये कोणत्या प्रकारे आपण आपला सहभाग देऊ इच्छिता?
Microsoft Office 2003 चा रूपसंच अधिकाधिक ग्राहकाभिमुख व सुलभ होण्यासाठी विविध सूचना तयार करणे, तसेच www.bhashaindia.com या वेबसाईटवर भारतीय भाषांतील संगणकीकरणावर लेख लिहिणे यासाठी मी प्रयत्न करीन.
Installation in Marathi computing
An interview with
Mr. S.P.Bhagwat
An interview with
Dr. Rajadhyaksha
Poem by
Mr. Shantaram Pawar
An interview with
Mr. Wagle Nikhil
An interview with
Mr. Moghe Sudhir
An interview with
Ms. Pratima Kulkarni
An interview with
Mr. Aroon Tikekar
Download Marathi LIP's
Work in Office 2003 in your language; download the Office 2003 Marathi LIP (Language Interface Pack) now.
Experience the convenience of working in Microsoft Windows XP in your language with the Microsoft Windows XP Marathi LIP (Language Interface Pack). Download now.
Partner Profile | Privacy Statement | Why Passport | Testimonials
This site uses Unicode for non-English characters and uses Open Type fonts.
©2003-2007 Microsoft Corporation. All rights reserved.