|
शांताराम पवार
सुविख्यात कलाकार आणि कवी. श्री. शांताराम पवार यांना जाहिरात क्षेत्र, कला, मराठी रंगभूमी आणि आधुनिक काव्य या क्षेत्रात मानाचे स्थान आहे. मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या ख्यातनाम कला महाविद्यालयामध्ये कला शिक्षक म्हणून अध्यापन करत असताना श्री. पवार यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडविले. श्री. शांताराम पवार यांनी निर्मिलेले व्यावसायिक संस्थांचे लोगो, चित्रपटांच्या श्रेयनामावली, पुस्तकांची मुखपृष्ठे, रंगभूमीवरील नेपथ्यांच्या प्रयोगांनी कला क्षेत्रातील नवनिर्मितीला चालना दिली. |
|
संगणकाची भाषा आपली, ओळखीची, घरगुती नसल्यामुळे परकी असल्यामुळे भारतातील कोटी कोटी बहुजनांसाठी संगणकाची खिडकी कधी उघडणार नाही असं संगणकतज्ज्ञांच्या लक्षात आलं आणि त्यांनी बहुजनसमाजाच्या सोयीसाठी थेट मातृभाषांचा वापर संगणकभाषा म्हणून करायचं ठरवलं. त्याच्या अंमलबजावणीसाठी ‘प्रोजेक्ट भाषा’ उपक्रम राबवला. त्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा!
|