About BhashaIndia | Contribute | SiteMap
  Patrons Developers
Hindi Tamil Kannada Gujarati Marathi Telugu Bengali Malayalam Punjabi Konkani Oriya Sanskrit Nepali
Home > Patrons > IndicIT > Marathi > PratimaKulkarni Welcome Guest!
श्रीमती प्रतिमा कुलकर्णी
श्रीमती प्रतिमा कुलकर्णी या मराठी रंगभूमी आणि दूरचित्रवाणीवरील आघाडीच्या दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका आहेत. तसेच काही मराठी मालिकांमधून श्रीमती प्रतिमा अभिनेत्री म्हणूनही महाराष्ट्रातील जनतेला परिचित आहेत. मराठी आणि इंग्रजी या भाषांखेरीज जपानी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. कॉन्स्युलेट जनरल ऑफ जपान, मुंबई येथे कल्चरल असिस्टंट हे पद त्यांनी ४ वर्षे सांभाळले. आजही श्रीमती प्रतिमा जपानी अनुवादक व दुभाषा म्हणून काम करतात.
आपण Microsoft Office 2003 मराठी सॉफ्टवेअर पाहिले का? (आम्ही आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितो)
हो, मी Microsoft Office 2003 हे मराठी सॉफ्टवेअर पाहिले आणि पाहून अतिशय आनंद झाला. खूप आधीपासून याची निकड व्यक्तिशः मला जाणवत होती.
Microsoft त्यांच्या Project Bhasha या उपक्रमाद्वारे Windows XP, Microsoft Office 2003 यासारख्या जागतिक सॉफ्टवेअर्सची भारतीय भाषांमधून निर्मिती करीत आहे त्याबाबत आपल्याला काय वाटते?
ह्या उपक्रमामुळे संगणक तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल. त्यामुळे भारतातील खेड्यापाड्यातले जीवनमान, ज्ञान व माहितीचे स्त्रोत इत्यादीमध्ये लक्षणीय वाढ होईल जी गुणात्मक असेल. प्रगती आणि विकासासाठी तंत्रज्ञान, त्याबद्दलची जागरुकता आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर हे सर्व अत्यावश्यक आहे. प्रोजेक्ट भाषामुळे हे सर्व केवळ स्वप्न न उरता ते वास्तवात उतरेल.
Microsoft Office 2003 मराठीमुळे मराठीच्या संगणक क्षेत्रातील मानकीकरणास चालना मिळेल असे आपल्याला वाटते का?
निश्चितच मिळेल. Microsoft सारख्या जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या कंपनीचा सहभाग असल्यामुळे त्याचा सर्व स्तरावर विनासायास स्वीकार तर होईलच. शिवाय अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यास जे आर्थिक पाठबळ लागते तेही सहज उपलब्ध होईल असा विश्वास वाटतो.
Microsoft Office 2003 मराठीमधील आवडलेल्या सुविधा – (त्यापैकी आपल्याला कोणती सुविधा सर्वात उपयोगी वाटली?)
Microsoft Office 2003 मराठीमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये पाहिली. त्यापैकी Word मध्ये मराठीतून शोध-बदल, शीर्षलेख-तळलेख, Excel मधील सूत्रपट्टीमध्ये मराठी मजकूराची उपलब्धता, Powerpoint मध्ये संपूर्णपणे मराठीतून सादरीकरण तसेच Outlook मधून मराठीतून इ-मेल या सुविधा मला अतिशय उपयुक्त वाटल्या.
Microsoft Office 2003 मराठीमध्ये मजकूराची साठवण संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय यूनिकोड मानकावर आधारित असल्यामुळे, मराठी भाषेतील मजकूर (Text) व माहितीकोष (Database) यांची इंटरनेट व इतर संवाद माध्यमांद्वारे देवाणघेवाण करणे सुलभ होईल असे आपल्याला वाटते का?
मी स्वतः हे सर्व वापरत नसल्यामुळे त्याच्या उपयुक्ततेचा अंदाज मला नाही. परंतु ह्यामुळे माहिती व ज्ञानाची देवाणघेवाण अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल हे जाणवू शकते. दूरवरच्या भविष्याचा विचार करता हे संपूर्ण देशाच्या विकासासाठी हातभार लावू शकते.
Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिता का?
जरूर. माझ्या अनुभवाचा जर काही लाभ होणार असेल तर मी निश्चितच यामधे सहकार्य करू इच्छिते.
Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये कोणत्या प्रकारे आपण आपला सहभाग देऊ इच्छिता?
Microsoft च्या प्रोजेक्ट भाषा उपक्रमाद्वारे Microsoft Office 2003 मराठीबद्दल मराठी भाषिकांना व संस्थांना या सॉफ्टवेअरसंबंधी अधिक माहिती होण्यासाठी राबविल्या जाणार्‍या विविध योजनांमध्ये मी सहभागी होऊ इच्छिते.
Installation in Marathi computing
An interview with
Mr. S.P.Bhagwat
An interview with
Dr. Rajadhyaksha
Poem by
Mr. Shantaram Pawar
An interview with
Mr. Wagle Nikhil
An interview with
Mr. Moghe Sudhir
An interview with
Ms. Pratima Kulkarni
Download Marathi LIP's
Work in Office 2003 in your language; download the Office 2003 Marathi LIP (Language Interface Pack) now.
Experience the convenience of working in Microsoft Windows XP in your language with the Microsoft Windows XP Marathi LIP (Language Interface Pack). Download now.
Partner Profile | Privacy Statement | Why Passport | Testimonials
This site uses Unicode for non-English characters and uses Open Type fonts.
©2003-2007 Microsoft Corporation. All rights reserved.