डॉ. अरूण टिकेकर
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. डॉ. अरूण टिकेकर यांचे ऐतिहासिक संशोधनाच्या क्षेत्रातील योगदान सर्वश्रुत आहे. नवी दिल्लीमधील यु.एस्. लायब्ररी ऑफ काँग्रेस येथे भाषाशास्त्रज्ञ आणि टाईम्स ऑफ इंडियामध्ये संशोधन विभागाचे मुख्य या नात्याने डॉ. टिकेकरांनी काम पाहिले. लोकसत्ता या वृत्तपत्राचे ते दीर्घकाळ संपादक राहिले. आजमितीस डॉ. टिकेकर सकाळ पेपर्स लिमिटेड या मराठीतील नामांकित आणि सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राचे संचालक-संपादक आहेत.
आपण Microsoft Office 2003 मराठी सॉफ्टवेअर पाहिले का? (आम्ही आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितो)
काळजीपूर्वक पाहिले. हे कुणी तरी करणे अत्यावश्यक होते. मराठी सॉफ्टवेअर शहरवासी मुलामुलींना आवश्यक वाटणार नाही कदाचित्. पण संगणकाचा प्रसार गावागावातील शाळात व्हावयाचा असेल तर मला हा प्रयत्न योग्य वाटतो. काळानुरूप तर वाटतोच, पण काळाची गरजही तीच आहे. म्हणून स्वागतार्हही वाटतो.
Microsoft त्यांच्या Project Bhasha या उपक्रमाद्वारे Windows XP, Microsoft Office 2003 यासारख्या जागतिक सॉफ्टवेअर्सची भारतीय भाषांमधून निर्मिती करीत आहे त्याबाबत आपल्याला काय वाटते?
स्वागतार्ह आहे, कारण मायक्रोसॉफ्टच्या विश्वसनीयतेचा लाभ होईल.
Microsoft Office 2003 मराठीमुळे मराठीच्या संगणक क्षेत्रातील मानकीकरणास चालना मिळेल असे आपल्याला वाटते का?
होय. सध्या मराठीमध्ये शुद्धलेखनाच्या बाबतीत मुक्तछंद सुरू आहे. प्रमाणीकरण वा मानकीकरणालाच आव्हान मिळाले आहे, दिले गेले आहे. ही प्रक्रिया या प्रयत्नांमुळे उलट्या आणि योग्य दिशेने सुरू होईल, असे मला वाटते.
Microsoft Office 2003 मराठीमधील आवडलेल्या सुविधा – (त्यापैकी आपल्याला कोणती सुविधा सर्वात उपयोगी वाटली?)
Microsoft Office 2003 मराठीमधील रूपसंच (Interface), बहुविध कीबोर्डस्, वर्णमालेनुसार अकारविल्हे क्रमवारी या सुविधा मला आवडल्या. तसेच Word मधील शोध-बदल, शीर्षलेख-तळलेख, Excel मधील सूत्रपट्टीमधील मजकूर, तक्ते व आलेख, Powerpoint मधील सादरीकरण आणि Outlook मधून इ-मेल पाठविणे या सर्व सोयीही आता मराठीतून उपलब्ध झाल्याने उपयोगी आहेत.
Microsoft Office 2003 मराठीमध्ये मजकूराची साठवण संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय यूनिकोड मानकावर आधारित असल्यामुळे, मराठी भाषेतील मजकूर (Text) व माहितीकोष (Database) यांची इंटरनेट व इतर संवाद माध्यमांद्वारे देवाणघेवाण करणे सुलभ होईल असे आपल्याला वाटते का?
होय.
Microsoft Office 2003 मराठीत उपलब्ध झाल्यामुळे Microsoft Office Access 2003, InfoPath 2003, Microsoft Office forms, स्मार्ट दस्तऐवज इत्यादींवर आधारित छोट्या व मध्यम संस्थांना आवश्यक मराठी रूपसंचातील सॉफ्टवेअर्सच्या निर्मितीला मिळेल असे वाटते का?
होय.
Microsoft Office 2003 मराठीचा महाराष्ट्रातील जनतेला खर्‍या अर्थाने फायदा होण्यासाठी त्यामध्ये कोणत्या अधिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते?
शब्दकोश आवश्यक तसा पर्यायी शब्दकोश आवश्यक आहेत.
Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिता का?
त्यादृष्टीने अवश्य प्रयत्न करू.
Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये कोणत्या प्रकारे आपण आपला सहभाग देऊ इच्छिता?
Microsoft Office 2003 च्या भविष्यातील नवीन आवृत्त्यांमधील शब्दकोश, शुद्धलेखन व व्याकरण इत्यादींची निर्मिती तसेच या सॉफ्टवेअरबद्दल मराठी भाषिकांना व संस्थांना अधिक माहिती देण्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन.