मायक्रोसॉफ़्ट ऑफ़िस प्रोजेक्ट २००७

 

मायक्रोसॉफ़्ट ऑफ़िस प्रोजेक्ट स्टँडर्ड २००७, तुम्हाला उपयोगिता, शक्ति व लवचिकता यांच योग्य मिश्रणयुक्त जोमदार प्रकल्प व्यवस्थापन साधने उपलब्ध करून देतो ज्याने तुम्ही प्रकल्प जास्त कार्यक्षमतेने आणि परिणामकारकतेने हाताळू शकता. तुम्हाला अद्यतन माहिती मिळून तुम्ही प्रकल्पाच्या कामांवर, वेळापत्रकांवर व आर्थिक देवघेवींवर नियंत्रण ठेवू शकता, प्रकल्प संघास एकसूत्री ठेवू शकता, आणि मायक्रोसॉफ़्ट ऑफ़िस प्रणाली कार्यक्रमांच्या एकीकरणाने, क्षमतापूर्ण अहवालांच्या, मार्गदर्शित नियोजनांच्या आणि लवचिक साधनांच्याद्वारे जास्त उत्पादनक्षम बनू शकता.

 

      या आवृत्तीस पूर्वीच्या आवृत्तींपेक्षा बळकटी देणार्‍या गुणधर्मांपैकी काही असे आहेत

 

ट्रेस

कार्यपूर्ती तारखांना प्रभावित करणारे कारक चटकन हेरून तसेच कारकांचे स्त्रो सहजतेने शोधून जबाबदारी निभावण्यास सक्षम करतो. टास्क ड्रायव्हर्स तुम्हाला काम सुरु करण्याच्या तारखेला प्रभावित करणारे काही कारक जाणण्यास मदत करतात (जसे कामाची पराधीनता, दिनदर्शिकेची अडचण, पूर्वनियोजित तारीख, किंवा सुटीचा काळ), ज्याच्याद्वारे  तुम्ही कारकांच्या श्रृंखलेचा मागोवा घेत उशिराच्या मूळ कारणापर्यंत पोहोचू शकाल

 

आर्थिक नियंत्रण

अंदाजपत्रक क्षेत्राद्वारे तुम्ही प्रकल्प व कार्यक्रमांसाठी अंदाजपत्रके आखू शकता. नवे किंमत स्त्रो प्रकार दराचा अंदाज व मागोवा वाढवते. अन्य मूल्य संवर्धनात, प्रकल्प लेखा प्रणालीमध्ये मागोवा घेतला गेलेल्या आर्थिक क्षेत्रांना सुव्यवस्थितपणे दर्शवणाऱ्या कॉस्ट कोड सारख्या पूर्वनिर्धारित क्षेत्रांचा समावेश असतो.

 

नकाशे

दृष्य अहवाल गुणधर्म मायक्रोसॉफ़्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ़्ट ऑफ़िस व्हिजियो प्रोफेशनलचा वापर करुन प्रकल्प माहितीवर आधारित पिव्हटटेबल आलेखन, नकाशे, आलेख व आकृत्या निर्माण करतात.  उपयोगकर्ता सहजतेने अहवाल नमुने अनुरूप करु शकतो आणि त्यांचा अन्य प्रकल्प उपयोगकर्त्यांसोबत सहवापर देखील करु शकतो.

 

नमूने

वेळ वाचविण्यासाठी तुमचे प्रकल्प पूर्वनियोजित नमून्यांसह सुरू करा. तुमचा स्वत:च्या चालीचा नमुना तयार करा किंवा ऑफ़िस प्रोजेक्ट स्टँडर्ड २००७ बरोबर पुरविल्या गेलेल्या कित्येक नवीन चाकोरी-बाह्य नमुन्यांपैकी एक वापरा. मायक्रोसॉफ़्ट ऑफ़िस ऑनलाइन या वेब साइटवरूनही तुम्ही नमुने उतरवून घेवू शकता.

 

समापन

प्रकल्प व्यवस्थापन प्रक्रियेवर प्रोजेक्ट मार्गदर्शकाच्या सहाय्याने शीघ्रतेने प्रभुत्व प्राप्त करा जो टप्प्या टप्प्याने परस्पर क्रियाशीलतेद्वारे तुमचे प्रकल्प उभारण्यात, ठरवलेल्या कामांचे व स्त्रोतांचे व्यवस्थापन करण्यात, स्थितीचा पाठपुरावा करण्यात, आणि प्रकल्प माहिती अहवाल सादरीकरणात मदत करतो.