http://www.windowsmedia.com


विंडोजमीडिया.कॉम हे विंडोज प्रारूप वापरून ऑनलाइन मीडिया स्ट्रीमिंगसाठी एक प्रवेशस्थळ आहे. हे संगीत, व्हीडियो, सिनेमा, टीव्ही, खेळ, इंटरनेट रेडियो आणि इतर बरेच काही उपलब्ध करून देते. दुसऱ्या शब्दांत, यात विंडोज मीडिया सेंटर, विंडोज मीडिया प्लेयर आणि विंडोज मीडिया एनकोडर यांचे गुणधर्म आणि सेवा यांचे मिश्रण आहे.


संगीत प्रेमींसाठी यात बरेच काही आहे. संगीत क्षेत्रातील नवीनतम आणि सर्वोत्तमचा आनंद घेण्यासाठी हे तुम्हाला महिन्याचा कलाकार आणि उभरता कलाकार देते. तुमची आवड जरा वेगळी असल्यास - तुम्ही मस्त कंट्री, डांस आणि पॉप संगीत ऐकू शकता.
सप्ताहांतासाठी, जेव्हां तुम्हाला विश्रांति आणि मौजमजा हवी असते, हिप-हॉप, रॉक आणि आल्ट विभाग आहेत,जिथे तुम्हाला प्रत्येक अवसरासाठी साजेसे संगीत मिळेल. सर्वात चांगली गोष्ट स्हणजे तुम्हाला संगीत विनामूल्य डाउनलोड करून घेता येईल.


सिनेमाचे चाहते सध्याचा हिट सिनेमा, येणारे सिनेमा आणि जाहीर झालेल्या डीव्हीडी यांबद्दल माहिती मिळवू शकतील.


तुम्हाला टेलीव्हिजन आवडत असेल आणि तुमच्या आवडत्या मालिकांचे वेळापत्रक जाणून घ्यायचे असेल, तर टीव्ही विभाग पहा.


खेळ, इंग्रजीतर भाषा बोलणारे आणि इंटरनेट रेडियोचे चाहते विभिन्न खेळ आणि वाहिनींमध्ये मग्न होऊन भरपूर आनंद लुटू शकतात.