शेयरपॉईंट
शेयरपॉईंट पारंपरिक सहयोग, दस्तऐवज प्रबंधन, शोध आणि पोर्टल क्षमता, तसेच वैयक्तिक, सांघिक इंट्रानेट आणि इंटरनेट यांसाठी सक्षम आराखडा यांची सांगड घालून आपल्याला एक असा अनुभव देते जो वेब आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस यांच्या पलिकडे जातो, आणि ज्याने या उद्योगात काय शक्य आहे यासंबंधी संकल्पनांना तडा दिला आहे. आज शेयरपॉईंट या उद्योगातील हजारो संस्थांद्वारे वापरला जाणारा अग्रणी सहयोग मंच आहे ज्याला कोट्यावधी डॉलरच्या वातावरणात कार्यरत भागीदारी समाधानांच्या एका विस्तृत श्रृंखलेचा पाठिंबा आहे. शेयर पॉईंटमध्ये उच्च क्षमता जोडली गेली आहे ज्यात सामील आहेत शक्तिशाली फास्ट शोध, प्रगत एक्सेल आणि पॉवर पिव्हट बिझनेस इंटेलिजेंस आणि मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स व एसएपी व्हाया ड्युएट सह लाइन ऑफ बिझनेस इंटीग्रेशन.
http://sharepoint.microsoft.com/blog/Pages/default.aspx
शेयरपॉईंटच्या यशामागे आहे त्याचे पुढील स्तरावरील साधेपणा आणि लवचिकता यांचे संतुलन. या विकेंद्रीकरण व सबलता देणाऱ्या उपायांचा एक लाभ असा आहे की कर्मचारी कोणताही अडथळा आल्याशिवाय चटकन चुका सुधारु शकतात किंवा जरुरी बदल करु शकतात. वापरकर्ते शेयरपॉईंटच्या सोप्या वापराचा आनंद, तसेच त्यांच्या कौशल्य स्तरावर अवलंबून सीएमएससोबत विविधतेने देवघेव करण्याची लवचिकताही कित्येक देशांत आणि कित्येक भाषांत उपभोगत आहेत. गैर तांत्रिकी कर्मचारीवर्गही कमीत कमी प्रशिक्षणाद्वारे व वेब संघाच्या मदतीशिवाय पेजेस किंवा उप-साईट्स जोडून त्यांना नेमून दिलेले विभाग विस्तारीत करु शकतात. यामुळे सामग्री केवळ रचनात्मकरीत्या तयारच होऊ शकत नाही, तर ती वेब वर देशातच किंवा विभागाच्या आतच लागू केली जाऊ शकते.
शेयरपॉईंट 2010 च्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्वाचे आहे व्यवस्थापित मेटाडेटा सेवा, जे मॉडेलिंगसाठी व एक उच्च कॉर्पेरेट टॅक्सोनॉमी घडवण्यासाठी सहाय्य पुरवते.