युएसबी 3.0

                       

                              युएसबी 2.0 पेक्षा 10 पट अधिक वेगवान तसेच सुधारित उर्जा व्यवस्थापन, ज्यामुळे बॅटरी दीर्घायुषी होते, जगातील सर्वात लोकप्रिय पीसी इंटरफेसमध्ये सुधारणेकरिता भाग पाडणाऱ्या कारणांना युएसबी 3.0 सादर करते. 2015 पर्यंत, सर्व नवे पीसींद्वारे युएसबी 3.0 पोर्टस प्रस्तुत करणे अपेक्षित आहे, व त्या एकाच वर्षात 2 अरब च्या वर नवीन "सुपर स्पीड" युएसबी डीवायसेस विकले जातील. युएसबी 3.0 मध्ये गुंतवणूक करणे हा अगदी सोपा निर्णय होता, पण सद्य युएसबी एकोसिस्टमशी तडजोड न करता तसे करणे म्हणजे एक पेलण्यास मोठे कठीणच आव्हान होते. उत्पत्त होणाऱ्या युएसबी 3.0 हार्डवेअरला समर्थन देण्याकरिता आमच्या संरचनेस सुधारित 3.0 स्पेशीफीकेशन्सला विशेषतः पाळावे लागले. अशी अरबो जुनी युएसबी डीवायसेसही आहेत ज्यांच्याशी विंडोजला कंपॅटीबल रहावेच लागेल. ऱ्या

1996 मध्ये पहिले युएसबी स्पेसीफिकेशन, ज्याने युएसबी डीवायसेस करिता दोन स्पीडची मर्यादा अंकित केली लो स्पीड 1.5 एमबीपीएस सोबत व फुल स्पीड 12 एमबीपीएस सोबत यांना अवतरवण्यात आले. 2000 साली, नवीन, उच्च 480 एमबीपीएस वेगाचे युएसबी 2.0 स्पेसीफिकेशन झोतात आले. उच्च वेगाची डीवायसेसनी सर्व कंट्रोलर्ससोबत काम पार पाडले, पण लो व फुल स्पीड डीवायसेस मात्र युएसबी 2.0 कंट्रोलर्ससोबत कार्यरत होण्यास फोल ठरली.

 

2008 साली स्टँडर्डस ऑर्गनायजेशनने नवीन होस्ट कंट्रोलरचा समावेश असलेल्या नवीन युएसबी 3.0 स्पेसीफिकेशनना अवतरित केले, ज्याचा 5 जीबीपीएसचा वेग असलेल्या नवीन "सुपर स्पीड" युएसबी डीवायसची व्याख्या घालून दिली. एकत्रितपणे, कंट्रोलर व डीवायस युएसबी 2.0 पेक्षा 10 पट तात्विक वेगाने कार्यक्षम होऊ शकले. या नव्या मानप्रमाणांबरोबर, युएसबी 2.0 बरोबर लागणाऱ्या 15 मिनिटांऐवजी 80 सेकंदात एक हाय डेफीनेशन मुवी एका युएसबी स्टोअरेज ड्राईव्हमधून कॉपी होऊ शकते. विनिर्देशांत नवीन ट्रंसफर प्रकार/स्ट्रीम्सना सुध्दा सादर केले, ज्याकरवी स्टोअरेज ड्राईव्हजना रीड व राईट अधिक क्षमतेने संसाधित करता येते.

 

नवीन स्पेसीफीकेशनने युएसबी 2.0 पेक्षा 80 टक्के जास्त पावर पुरवली. याचा अर्थ म्हणजे वेगवान चार्जिंग व एक्सटर्नल डीवीडी ड्राईव्ज व अन्य उच्च वेगाच्या डीवायसेससाठी विचित्र "वायू केबल्स वापराच्या गरजेचे निष्कासन केले गेले. पण चार्जिंगच केवळ पावर विचारार्हता नाही. मोबाईल कप्युटींग सोबत, लोकांना असे पीसी हवेत जे बॅटरी आयुष्याचे जतन करतात. नवीन लो पावर स्टेट्सनाही अवतरित करुन, नेमित कामे जास्त वेगाने पूर्ण करत तसेच प्रत्येक उपलब्ध संधींत पावर डाऊन करत, युएसबी 3.0 हे त्याच्या पूर्वीच्यांपेक्षा अधिक पावर एफीशियंट आहे. याचा अर्थ म्हणजे नोटबुक्सकरिता दीर्घ बॅटरी आयुष्य व डेस्कटॉप्सकरिता कमी पावर व्यय. सर्वात महत्वाचे म्हणजे, नवीन स्पेसिफिकेशन हे फुल, लो, व हाय स्पीड डीवायसेस बरोबर मेळ राखत युएसबीच्या नव्या पीढीच्या अवतरणाचे आश्वासन देते. प्लग्ससुध्दा बॅकवर्ड कंपॅटीबल आहेत.

 

Read More on....