|
डॉ. विजया राजाध्यक्ष
कथालेखक व समीक्षक म्हणून ख्यातनाम. एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एस्.एन्.डी.टी. विद्यापीठात विभागप्रमुख व मराठीचे अध्यापन. १९९३ साली ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार. २००० साली इंदूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. |
|
 आपण Microsoft Office 2003 मराठी सॉफ्टवेअर पाहिले का? (आम्ही आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितो)
Microsoft Office 2003 मराठी सॉफ्टवेअर मी पाहिलं आणि त्याबद्दलची माझी प्रतिक्रिया नमूद करत आहे.
Microsoft त्यांच्या Project Bhasha या उपक्रमाद्वारे Windows XP, Microsoft Office 2003 यासारख्या जागतिक सॉफ्टवेअर्सची भारतीय भाषांमधून निर्मिती करीत आहे त्याबाबत आपल्याला काय वाटते? |
| प्रोजेक्ट भाषा हा Microsoft चा उपक्रम अतिशय चांगला आहे, स्वागतार्ह आहे. सर्व थरांतील सामान्य माणसांपर्यंत तो पोचू शकेल. इंग्रजी येत नाही, म्हणून संगणक वापरता येत नाही अशी अडचण राहणार नाही. ज्ञानाची द्वारे सर्वांना खुली होतील. |
|
| Microsoft Office 2003 मराठीमुळे मराठीच्या संगणक क्षेत्रातील मानकीकरणास चालना मिळेल असे आपल्याला वाटते का? |
| नक्कीच. संगणकाच्या क्षेत्रातील नवागत ग्राहकाचा गोंधळ त्यामुळे कमी होईल. त्याचा संगणकाच्या वापरातील आत्मविश्वास वाढेल. |
|
| Microsoft Office 2003 मराठीमधील आवडलेल्या सुविधा – (त्यापैकी आपल्याला कोणती सुविधा सर्वात उपयोगी वाटली?) |
| Microsoft Office 2003 मराठीमधील मराठी रूपसंच, तरंगते दृश्यमान कीबोर्डस्, मराठीतून शोध-बदल, शीर्षलेख-तळलेख, वर्णमालेनुसार अकारविल्हे क्रमवारी, सूत्रपट्टीमध्ये मराठी मजकूराची उपलब्धता, तक्ते व आलेख, मराठीतून सादरीकरण आणि मराठीतून इ-मेल या सोयी सर्वात उपयोगी वाटल्या. |
|
| Microsoft Office 2003 मराठीमध्ये मजकूराची साठवण संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय यूनिकोड मानकावर आधारित असल्यामुळे, मराठी भाषेतील मजकूर (Text) व माहितीकोष (Database) यांची इंटरनेट व इतर संवाद माध्यमांद्वारे देवाणघेवाण करणे सुलभ होईल असे आपल्याला वाटते का? |
| होय. अशा देवाणघेवाणीची गरज आहे. ती तर भागेलच. पण मराठीत होणारे विविध क्षेत्रांतील कामही त्यामुळे विशिष्ट भाषेच्या व प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून पलीकडे पोचेल. |
|
| Microsoft Office 2003 मराठीत उपलब्ध झाल्यामुळे Microsoft Office Access 2003, InfoPath 2003, Microsoft Office forms, स्मार्ट दस्तऐवज इत्यादींवर आधारित छोट्या व मध्यम संस्थांना आवश्यक मराठी रूपसंचातील सॉफ्टवेअर्सच्या निर्मितीला मिळेल असे वाटते का? |
| होय. संस्थांनाही हे काम विविध प्रकारची मदत करू शकेल. त्यांच्या निर्मितीला चालना मिळेल. |
|
| Microsoft Office 2003 मराठीचा महाराष्ट्रातील जनतेला खर्या अर्थाने फायदा होण्यासाठी त्यामध्ये कोणत्या अधिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते? |
| आज सर्वच क्षेत्रांत शुद्धलेखनाची स्थिती दयनीय आहे. या दृष्टीने महामंडळाचे शुद्धलेखनविषयक नियम एखाद्या ‘कार्यक्रमा’च्या द्वारे उपलब्ध करून द्यावेत. चुकीचे लेखन केल्यास त्या चुका दाखवणारी, इंग्रजीतील Spell Check सारखी एखादी योजना असावी. विरामचिन्हांबाबतही तज्ञांचा सल्ला घेऊन काही संकेत निश्चित करावेत व तेही उपलब्ध करून द्यावेत. सर्वात मोठी गरज पर्यायी शब्द उपलब्ध करून देणे ही आहे. त्यामुळे मराठी भाषेचे वैभव तर लक्षात येईलच, पण लेखनात येणारी शब्दांची अर्थहीन पुनरुक्तीही टळेल. |
|
| Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिता का? |
| या स्वागतार्ह उपक्रमात सहभाग घेणे मला आवडेल. |
|
| Microsoft च्या Project Bhasha उपक्रमामध्ये कोणत्या प्रकारे आपण आपला सहभाग देऊ इच्छिता? |
| Microsoft Office 2003 च्या भविष्यातील नवीन आवृत्त्यांमधील शब्दकोश, शुद्धलेखन व व्याकरण इत्यादी सुविधांच्या निर्मितीमध्ये सहभाग. |